ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सौ हेमा प्रभाकर सावंत यांची बिनविरोध निवड सौ सावंत या पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्षा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सौ हेमा प्रभाकर सावंत यांची बिनविरोध निवड सौ सावंत या पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्षा

प्रकाशन: 24 Feb 2023 06:30 PM
वाचन संख्या 119

वैभववाडी/नवलराज काळे सहसंपादक – ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ची तहकूब विशेष ग्रामसभा आज रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाले या सभेमध्ये माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच दीपक चव्हाण यांनी सरपंच निवडणुकीआधी तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्ष पद हे रिक्त होते आज झालेल्या सभेमध्ये या पदाची निवड करण्यात आली यावेळी ग्रामसभेत हेमा प्रभाकर सावंत यांच्या नावाची सूचना ग्रामस्थ मोहन जंगम यांनी केली. व सदर सूचनेला नवलराज काळे यांनी अनुमोदन दिले व ठराव सर्वानुमते मंजूर झाला यामुळे सौ हेमा प्रभाकर सावंत या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडून आल्या. यावेळी सरपंच दीपक चव्हाण, ग्रामसेवक प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, प्रियांका पाटील, विशाखा काळे, विलास जंगम, दीक्षा रावराणे, रोशनी बाणे, सोसायटी चेअरमन संतोष बाळकृष्ण भोसले, गंगाराम शिंदे, अंकिता डेळेकर, नाऊ बोडेकर, नंदकुमार रावराणे, हरिचंद्र माने, सुप्रिया चव्हाण, सुनिता पाटील, अजितसिंह काळे, लक्ष्मण शेळके बबन शेळके, अंबाजी बोडेकर, महेंद्र शेळके राजेंद्र बोडेकर जयवंत बोडेकर प्रकाश शेळके, श्री पारखे, श्री धामणे, अंगणवाडी सेविका सविता पाटील, मोहन जंगम, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील रूपाली रावराणे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स