ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार बांदा येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न कणकवली : वार्ताहर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार बांदा येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न कणकवली : वार्ताहर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

प्रकाशन: 23 Feb 2023 10:45 PM
वाचन संख्या 42

कणकवली वार्ताहर :मुंबई / सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे रविवार, १९ फेब्रुवारीला पार पडला. सोहळ्यात फोंडाघाट येथील पत्रकार तथा ‘कोकण एक्सप्रेस च्या संपादिका सौ. संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.पुरस्कार प्रदान करताना व्यासपिठावर सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब, उद्योजक विशाल परब,बांदा सरपंच सौ. प्रियंका नाईक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, माजी शिवसेना महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गोवा संपर्कप्रमुख शिवाजी नेहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.संजना हळदिवे गेली सहा ते सात वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. चार वर्षांपूर्वी, अगदी कोरोनाचे संकट असतानाही त्यांनी स्वत : चे ‘कोकण एक्सप्रेस’ नावाचे ‘ डिजिटल न्यूज चॅनेल ’ सुरु करण्याचे धाडस दाखवले. असा स्वत:चा न्यूज चॅनेल सुरु करणाऱ्या संजना या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला पत्रकार आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून पत्रकारिता करताना त्यांनी अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे मुळ कोल्हापूरच्या असणाऱ्या संजना या लग्नानंतर कणकवली तालुक्यात आल्या. मात्र, सिंधुदुर्ग हीच कर्मभूमी मानून त्या पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाने पुरस्काराने गौरविले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजना यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर यापुढेही पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील समस्या, प्रश्नांची सोडवणूक करणार असून सदैव वस्तुनिष्ठ बातमीदारी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संजना यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स