ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरा, रोणापाल व इन्सुलीत अज्ञात युवकांनी मंदिर फोडले मडुरा, रोणापाल, इन्सुली परिसरात खळबळ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरा, रोणापाल व इन्सुलीत अज्ञात युवकांनी मंदिर फोडले मडुरा, रोणापाल, इन्सुली परिसरात खळबळ.

प्रकाशन: 23 Feb 2023 10:57 PM
वाचन संख्या 36

बांदा / राकेश परब : मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे युवक चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. तिनही ठिकाणी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. बांदा पोलीसात चोरीबाबत फिर्याद नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात फारशी रोकड नव्हती. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. रोणापाल मंदिरात फंडपेटीच नसल्याने चोरट्यांना याठिकाणी काहीच गवसले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. हा प्रकारही सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फुटेजमध्ये अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोघे युवक दिसत आहेत. बांदा पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलीसांसमोर चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे.

चोरीच्या तीनही घटनांमध्ये रोकड किंवा मौल्यवान वस्तू चोरीस न गेल्याने पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांकडून रीतसर तक्रार देण्यात आलेली नाही. रोणापाल व इन्सुली मंदिरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. चोरट्यांनी मास्क वापरल्याने चेहरा स्पष्ट दिसत नाही. अन्य पर्याय तपासण्याचे काम सुरु असल्याचे एपीआय काळे यांनी सांगितले. या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स