ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

प्रकाशन: 23 Feb 2023 05:02 PM
वाचन संख्या 54

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर : श्री स्वामी समर्थांची भक्ती स्वामी भक्तांसाठी खूप मोलाचे असते. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लोकहिताची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अवतार कार्याची माहिती ही सर्वश्रुत आहेच. मीही एक निस्सीम श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. या धरतीवर स्वामी भक्तीच्या आश्रयातून व गोव्याच्या मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपणही लोक हिताची कामे स्वामी सेवा समजून करीत आहोत. या कार्यास श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. त्यामुळे माझ्या या कार्यातच स्वामी व स्वामी दर्शनातच माझ्या जीवनाचे हितार्थ असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. नुकतेच त्यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, पी.आय.जितेंद्र कोळी, चंद्रकांत पुजारी, बाळा शिंदे, नन्नू कोरबू, रजाक सय्यद, युवा अध्यक्ष ऋषिकेश लोणारी, शिवशरण अचलेर, पंचप्पा म्हेत्रे, धनराज शिंदे, गजानन शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व स्वामीभक्त उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स