ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरीव विकास निधीसाठी कुडाळ भाजपच्यावतीने डाँ. निलेश राणे यांचे मानले आभार.....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरीव विकास निधीसाठी कुडाळ भाजपच्यावतीने डाँ. निलेश राणे यांचे मानले आभार.....!

प्रकाशन: 23 Feb 2023 02:57 PM
वाचन संख्या 41

ब्यूरो चिफ/ विवेक परब-मागील अडीच वर्ष विकासात्मक निधी पासून कोसो दूर असलेल्या कुडाळ तालुक्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. कुडाळ तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विकास कामात प्रत्येक हेडला प्राप्त निधीची सविस्तर माहिती प्रत्येक गावागावात जाऊन भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळवर अन्याय होता कामा नये याची विशेष काळजी घेतली आणि याकामी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काटेकोरपणे पालन करत विशेष सहकार्य केले.याबद्दल आपण या सर्व नेत्यांचे कुडाळ तालुक्याच्या वतीने जाहीर ऋण व्यक्त करतोच आणि येणाऱ्या काळात कुडाळ तालुक्यातील बहुतांशी कामे मार्गी लावण्यासाठी तसा पाठपुरावा करून कुठल्याही गावावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. यावर्षी झालेल्या यावर्षी मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये स्थानिक नागरिक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आलेल्या कामांना मंजुरी मिळाली आहे हे या जिल्हा नियोजन समितीचे वैशिष्ट्य आहे मागच्या काही कालावधीत कॉन्ट्रॅक्टर आणि  काँट्रॅक्टर लॉबीचे प्रमुख स्थानिक आमदार हेच विकास कामांची यादी अंतिम करत होते. परंतु यावेळी मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्या सततच्या पाठपुरावाच्या आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागलेली आहेत. याबद्दल कुडाळ भाजपच्या वतीने डाँ. निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले. पत्रकार परिषदेत कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक गणेश भोगटे, सोशल मीडिया युवा जिल्हा अध्यक्ष राजवीर पाटील, संजय परब आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स