ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
न. पं. चे मुख्याधिकारी सुरज कांबळे कारवाईसाठी उतरले रस्त्यावर : कडेकोट पोलीस बंदोबस्त
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

न. पं. चे मुख्याधिकारी सुरज कांबळे कारवाईसाठी उतरले रस्त्यावर : कडेकोट पोलीस बंदोबस्त

प्रकाशन: 23 Feb 2023 10:06 PM
वाचन संख्या 87

वैभववाडीत स्टॉल हटाव मोहिम सुरु

सहसंपादक / नवलराज काळे- वैभववाडी शहरात स्टॉल हटवण्याची धडक मोहीम नगरपंचायतने सुरू केली आहे. हटविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे वातावरण तणावाचे झाले आहे.सकाळी 11 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली होती. परंतु स्टॉलधारकानी आक्रमक पवित्रा घेत विरोध केला होता. मात्र मुख्याधिकारी स्टॉल हटविण्यावर ठाम राहिले होते. मुख्याधिकाऱ्यांनी दोन तास मुदत दिली होती. स्टॉलमधील साहित्य बाजूला करा. हटाव मोहीम ही होणारच आहे. असे सांगितले. त्यानुसार 3 वा.पासून स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, राजन तांबे, निकम, यामिनी वळवी, स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत व नगर पंचायत अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स