रामेश्वर वाचन मंदिर येथे 27फेब्रूवारीला खुली वाचक स्पर्धा
ब्युरो चिफ-विवेक परब सोमवार २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिर तर्फे खुली वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यासाठीप्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर स्पर्धकाने कमीत कमी १० तर जास्तीत जास्त १२ मिनिटे समीक्षणात्मक बोलायचे आहे.
या स्पर्धेसाठी रोख रकमेची बक्षिसे सौ. भावना रमेश मुणगेकर, सौ. उर्मिला सांबारी, अर्जुन बापर्डेकर यांजकडून पहिल्या ३ क्रमांकांना तर बाबाजी भिसळे व अशोक कांबळी यांजकडून २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम येणाऱ्या फक्त १० स्पर्धकांना प्रवेश असून नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क नंबर -०२३६५-२४६०१७ – सकाळी १० ते दुपारी ४ संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)