ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कवयित्री सरिता पवार यांच्या "राखायला हवी निजखूण" काव्यसंग्रहास डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती  काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कवयित्री सरिता पवार यांच्या "राखायला हवी निजखूण" काव्यसंग्रहास डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 21 Feb 2023 09:13 PM
वाचन संख्या 67

26 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत 57 व्या वार्षिक संमेलनात होणार पुरस्कार वितरण.

संतोष साळसकर | सहसंपादक: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवयित्री हर्षदा सुंठणकर यांच्या कपडे वाळत घालणारी बाई या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 1966 साली स्थापन झालेल्या काव्यरसिक मंडळ डोंबिवली चे 57 वे वार्षिक संमेलन संमेलनाध्यक्ष कवयित्री जयश्री हरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी पुरस्कार वितरण केले जाणार आहे.रोख रक्कम स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राजगृह प्रकाशन ने प्रकाशित केलेला कवयित्री सरिता पवार यांचा राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.सर्वसामान्य वाचकांचीही काव्यसंग्रहाला भरभरून दाद मिळत आहे. मानवमुक्तीचा गजर करत सकल मानवतेला साद घालणारा काव्यसंग्रह असा ठसा राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाने मराठी साहित्य विश्वात उमटवला असून अल्पावधीतच वाचकांची पसंती काव्यसंग्रहाने मिळवली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स