ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
चिंदर सेवा संघ आयोजित भगवंतगड किल्ला येथे शिवजयंती उत्साहात संपन्न
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चिंदर सेवा संघ आयोजित भगवंतगड किल्ला येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

प्रकाशन: 19 Feb 2023 11:08 PM
वाचन संख्या 84

ब्यूरो चिफ/विवेक परब- मालवण तालुक्यातील चिंदर भगवंतगड किल्ला येथे चिंदर सेवा संघ अनेक वर्षे शिवजयंती उत्सव साजरा करत आहे. आजही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. उपसरपंच दिपक सुर्वे व किशोर परुळेकर यांच्या हस्ते शिवछत्रपतीच्या मूर्तीला व सिध्देश्वराला पुष्पहार अर्पण करण्यात आला. किंजन परब हिने शिवाजी महाराजांनवर भाषण, भूषण दत्तदास यांने “आम्ही छत्रपतींचे शिलेदार, करूनी त्रिवार मुजरा,घालून लोटांगण चरणांवर, शिवजयंती करीतो साजरा” हि कविता तर आशिष कोरगांवकर याने “एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर” हा पोवाडा सादर केला. केंद्राप्रमुख प्रसाद चिंदरकर व राजेंद्र गाड यांनी शिवरायांन बाबत आपले विचार मांडले.

यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, सदाशिव गोसावी, किशोर परुळेकर, चिंदर सेवा संघ खजिनदार गणेश गोगटे, मारूती हडकर, गणेश पाताडे, उपाध्यक्ष विवेक परब, रोहन गांवकर, रविंद्र गोसावी, सिध्देश नाटेकर, विश्राम माळगांवकर, शिक्षक राजेंद्र गाड, विद्यार्थी, शिवप्रेमी उपस्थित होते. आज महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहिर झालेले ” जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा” हे गीत सर्वांनी एक सुरात गायीले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व समारोप सचिव ओमकार गोलतकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स