शिवजयंती उत्सव श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने श्री कुणकेश्वर येथे साजरी....!
ब्यूरो चिफ/ विवेक परब- मालवण तालुक्यातील पळसंब श्री जयंती देवी पंचायतन डाळपस्वारी कुणकेश्वर तीर्थयात्रेसाठी कुणकेश्वर येथे असल्यामुळे गावातील सर्व रहिवासी त्यासोबत असल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे पळसंब मधे साजरी होणारी शिव जयंती या वर्षी योगायोगाने कुणकेश्वर येथे व देवदेवतांच्या सानिध्यात साजरी करण्याचा दुर्मिळ योग श्री जयंती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाला मिळाला.त्यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजा देवस्थानचे मानकरी श्री. योगेश कापडी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी श्री शैलेश बोंडले, श्री. अण्णा कापडी, महेश कापडी, श्री. राजन पुजारे, दिलीप परब, घाडीगावकर, बबन पुजारे, सुरेश गावकर, दिवाकर पुजारे, अमित पुजारे, देवस्थानचे अध्यक्ष श्री. रमेश परब, मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, अक्षय परब, अमोल परब, रुपेश पुजारे, मनोज सावंत, राजा परब, पप्पू सावंत, शेखर पुजारे, अमरेश पुजारे तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रतिवर्षाप्रमाणे पळसंब मधे साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सवात खंड पडू नये म्हणून म्हणून मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत व मंडळाचा घेतलेल्या निर्णय बद्दल सर्व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)