शिरगाव तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र जोगल बिनविरोध
संतोष साळसकर | सहसंपादक
देवगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी देवगड पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र जोगल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेची १० फेब्रुवारीची तहकूब खास ग्रामसभा १३ फेब्रुवारीला सरपंच समीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसचिवालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली.
रवींद्र जोगल यांनी या ग्रूप ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच, शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तर देवगड पंचायत समितीचे उपसभापती, सभापती आदी पदे भूषविली आहेत.
या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र जोगल, उपाध्यक्ष, सचिवपदी पूर्वा सावंत तर निमंत्रक म्हणून पोलिस पाटील चंद्रशेखर साटम यांच्यासह ४३ जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र जोगल यांनी या ग्रुप आले.
शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मानद अधीक्षकपदी ते कार्यरत आहेत. नव्याने निवड झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)