ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सांगुळवाडीत (राववाडी) सुवर्ण महोत्सव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; मालवणचे बुवा श्री.भालचंद्र केळुसकर विरुद्ध कुडाळचे बुवा श्री.विनोद चव्हाण यांच्यात डबलबारी...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सांगुळवाडीत (राववाडी) सुवर्ण महोत्सव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; मालवणचे बुवा श्री.भालचंद्र केळुसकर विरुद्ध कुडाळचे बुवा श्री.विनोद चव्हाण यांच्यात डबलबारी...!

प्रकाशन: 14 Feb 2023 01:02 PM
वाचन संख्या 178

हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा झाली जाहीर.

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी सांगुळवाडी (राववाडी) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शनिवारी १८ फेब्रुवारीला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचा सप्ताहाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने शनिवारी सकाळी ९ वाजल्या पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सुवर्ण महोत्सानिमित्त शनिवारी संपूर्ण दिवस व रविवारी दुपार पर्यंत महभोजनाचे आयोजन करण्यात आले.

या सुवर्ण महोत्सवी सप्ताह सोहळ्यासाठी चाकरमानी खास करून सांगुळवाडीत दोन ते तीन दिवस अगोदर दाखल होणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.

सकाळी ९.०० वाजता घटस्थापना , सकाळी ९.३० ते दुपारी २.००, स्थानिक भजने.
नंतर दुपारी २.०० ते ४.०० भजन- श्री संतोष खानविलकर बुवा, हनुमान भजन मंडळ (हेत), दुपारी ४.०० ते ६.००
भजन – श्री संजय वासुदेव पवार, बुवा, श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ (डोंबिवली ), सायंकाळी ६.०० ते ८.०० वा
हरिपाठ – संयोजक : ह.भ.प. श्री राजन साळुंखे,
ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, ( खांबाळे ),
रात्रौ ८.०० ते १०.०० वा.
भजन – श्री जया गोरे बुवा
श्री जया गोरे भजन मंडळ,
(वेंगुर्ले. तुळस ),
रात्री १०.०० ते १२.००
किर्तन – किर्तनकार – ह.भ.प. सौं.गितांजलीताई सोमवंशी ( नाशिक ),विषय – महाशिवरात्र निमित् महादेव शंकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत, गायक ह.भ.प. श्री पुंडलिक पांचाळ
(जांभवडे ), ह.भ.प. श्री बापू राणे (लांजा), ह.भ.प. श्री विश्वास महाराज जामदार (भोम), मृदंगमनमणी – श्री सूरज पवार (खंबाळे). विणेकरी – ह.भ.प. श्री मधुकर पांचाळ (जांभवडे), रात्रौ १२.०० ते पहाटे ४.००, डबलबारी भजन, बुवा : श्री विनोद चव्हाण, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घोडगे भरणी (कुडाळ ) विरुध्द बुवा : श्री भालचंद्र केळुसकर श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ,वायरी भूतनाथ (मालवण ) पख़वाज – श्री विशाल केळुसकर.

नंतर पहाटे ४.३० ते ६.३०
काकड आरती : संयोजक – ह.भ.प. श्री राजन साळुंखे, ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ (खांबाळे) ढोलपथक – श्री धोंडु पाष्टे आणि
मंडळी, पाष्टेवाडी. नंतर रविवारी १९ फेब्रुवारीला दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद अशी कार्यक्रमाची आखणी आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स