ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
महान-बेळणे-कणकवली रस्त्यावर रस्त्यावर महान येथे गतिरोधक घाला ; सरपंच अक्षय अजय तावडेंची मागणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महान-बेळणे-कणकवली रस्त्यावर रस्त्यावर महान येथे गतिरोधक घाला ; सरपंच अक्षय अजय तावडेंची मागणी.

प्रकाशन: 14 Feb 2023 12:34 PM
वाचन संख्या 84

२५ जानेवारीला मालवण तहसीलदारांच्या समक्ष अपघात झाल्याचाही दिला दाखला.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘महान- बेळणे-कणकवली’ मार्गावरील ग्रामपंचायत महान कार्यक्षेत्रात वर्दळीच्या अशा महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी महान सरपंच अक्षय अजय तावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदना द्वारे केली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. या मार्गावरील प्राथमिक शाळा महान कांदळगाव, साळसकर जनरल स्टोअर्स, गावडे दुकान वरचीवाडी रस्ता, गणेश कुंडाजवळ, हुमरस, माळगांव रस्त्यावर गावडे दुकान आदी महत्वाची ठिकाणे असून या ठिकाणहून गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर खनिज वाहतूक करणारी वाहने मोठ्या भरधाव वेगाने जातात.

२५ जानेवारी रोजी तहसिलदार मालवण यांच्या समक्ष दुचाकी वाहनांचा अपघात झालेला होता. या मालवण बेळणे आता मोठा रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील ठिकाणी तातडीने गतिरोधक मंजूर करणेत यावेत व मालवण बेळणे रस्त्याचे काम चालू असून सदर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांना गतिरोधक करणेकरिता आपल्या स्तरावरून सूचना देणेत याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच अक्षय तावडे यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स