ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
धुरीवाड्यातील मत्स्यजेटी बांधकाम जागेची मच्छिमार नेते व शिवसेना (उ.बा.ठा.) शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी पतन व मत्स्य अधिकार्यांसह केली पहाणी.

धुरीवाड्यातील मत्स्यजेटी बांधकाम जागेची मच्छिमार नेते व शिवसेना (उ.बा.ठा.) शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी पतन व मत्स्य अधिकार्यांसह केली पहाणी.

प्रकाशन: 13 Feb 2023 10:05 PM
वाचन संख्या 174

मच्छिमार नेते व शिवसेना (उ.बा.ठा.) शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश ; कुरण भागातील नागरीकांसाठीही मत्स्यजेटीचा वापर शक्य.

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखांच्या निधीची मंजुरी ; तालुका प्रमुख व मच्छिमार नेते हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर , माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर आणि सहकार्यांचे सहकार्य लाभल्याची बाबी जोगी यांनी दिली माहिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथे आज मच्छिमार नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी पतन अधिकारी व मत्स्य अधिकारी यांच्यासह सायबा हाॅटेल समोरील खाडीकिनारच्या ‘मत्स्यजेटी’ बांधकाम जागेची पहाणी केली.

याबद्दल पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी सांगितले की हा २० लाख रुपयांचा लोकोपयोगी प्रकल्प आमदार वैभव नाईक यांच्यामुळे मंजूर झाला असून आपण त्याबाबत पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवणतालुका प्रमुख व मच्छिमार नेते हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर आणि इतर सहकार्यांनीसुद्धा अत्यंत मोलाचे सहकार्य केले.

धुरीवाडा व कुरण भागातील नागरीकांनी आपल्याकडे तशी मागणी केली होती व ती आता पूर्णत्वाकडे जात आहे म्हणून आपल्याला व वाड्यातील स्थानिकांना समाधान वाटत असल्याचे पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी सांगितले.

आता या मत्स्यजेटीचा उपयोग तथा वापर मच्छिमार व सायबा हाॅटेल समोरील खाडीपलिकडचे कुरणवासीयही विनासायास करु शकतील अशी माहिती मच्छिमार नेते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स