ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण संस्थेच्या वतीने भडगांव ग्रामपंचायत येथे महिलांसाठी खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण.

कोकण संस्थेच्या वतीने भडगांव ग्रामपंचायत येथे महिलांसाठी खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण.

प्रकाशन: 10 Feb 2023 10:17 AM
वाचन संख्या 53

३२ महिलांनी घेतला सहभाग ; फेनोरी,खाज़ा,चकली,शेव, शंकरपाळी ,बालुशाहीच्या पाककलेचे प्रशिक्षण.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत भडगांव बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी भडगांव ग्रामपंचायत येथे १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी मोफत खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिला , शेतकरीवर्ग व युवकांना स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था सर्वतोपरी सहकार्य करत असते.

या प्रशिक्षणात बचत गटातील ३२ महिलांनी सहभाग घेतला होता. फेनोरी,खाजा,चकली,शेव, शंकरपाळी ,बालुशाही आदी खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या शिबिरासाठी श्रीम. प्रियांका शेटय़े प्रशिक्षक म्हणून लाभल्या होत्या. यावेळी संस्थेचे समन्वयक श्री. समीर शिर्के यांनी महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले.

ग्रामसेवक . अनिला घुगरे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिलांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भडगांव गावच्या सरपंच . प्रणिता गुरव यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या व कोकण संस्थेचे आभार मानले. या प्रशिक्षणाला उपस्थित सर्व महिलांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण कला व शिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रथमेश सावंत, श्री. प्रदीप पवार, .भावना साटम तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स