आंगणेवाडीत उद्या 'भटाची बायपास..!'
आंगणेवाडी नाट्यमंडळ मुंबई यांचा विनोदी नाट्यप्रयोग.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वा. आंगणेवाडी नाट्यमंडळ मुंबई यांचा ‘भटाची बायपास’ हा विनोदी नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकामध्ये प्रसाद नरेश आंगणे, प्रतीक आंगणे, दिनेश गंगाधर आंगणे, निशिकांत आंगणे, बागेश्री जोशीराव, रुचिता शिर्के, हिमांगी सुर्वे,नरेंद्र आंगणे, मिलिंद आंगणे यांच्या भूमिका आहेत.
या विनोदी नाटकाचे दिग्दर्शन महेश सावंत पटेल, रंगभूषा तारक कांबळी, नेपथ्य शरद कांबळी यांचे आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)