ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सिंधुदुर्ग जिल्हा 'ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या' नूतन कार्यकारिणीची झाली घोषणा.

सिंधुदुर्ग जिल्हा 'ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या' नूतन कार्यकारिणीची झाली घोषणा.

प्रकाशन: 03 Feb 2023 08:39 PM
वाचन संख्या 246

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची’ २०२३- २४ साठीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे व राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.

जिल्हाध्यक्ष म्हणून मंदार काणे- पडेल देवगड, जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे – हडपीड देवगड, जिल्हा सचिव -अर्जुन परब- माळगांव मालवण, जिल्हा महिला संघटक -सौ.मिलन पार्टे – कट्टा(नांदोस) मालवण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख -संजय खानविलकर -तळेरे कणकवली, जिल्हा संघटक डॉ.वैभव आईर ओरोस( सिंधुदुर्ग ) कुडाळ, जिल्हा महिला संघटक सौ.शिवानी पाटकर सावंतवाडी- शहर अशी नूतन कार्यकारणी आहे.

या सर्वांना पुढील वाटचालीसाठी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सर्वांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स