ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणच्या अविनाश पराडकर यांची भाजपा प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती ; सिंधुदुर्ग पुत्राला मोठी जबाबदारी प्राप्त झाल्याने जिल्हा भाजपा मध्ये चैतन्य.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणच्या अविनाश पराडकर यांची भाजपा प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती ; सिंधुदुर्ग पुत्राला मोठी जबाबदारी प्राप्त झाल्याने जिल्हा भाजपा मध्ये चैतन्य.

प्रकाशन: 03 Feb 2023 12:55 PM
वाचन संख्या 168

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौर्यात मिळाले होते संकेत.

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि सोशल मिडियावरील एक नियमीत प्रख़र लेखक श्री.अविनाश पराडकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीत भाजपाच्या प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती घोषित करण्यात आली.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती घोषित केल्यानंतर प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी यासंबंधी अधिकृतरित्या पत्राद्वारे प्रसिद्धीमाध्यमांना कळवले आहे.
अविनाश पराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे असून ते सोशल मीडियावरील समयोचित् सामाजिक व राजकीय लेखक म्हणून परिचीत आहेत.

त्यांनी यापूर्वी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची सोशल मीडिया संयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अविनाश पराडकर यांना प्रदेशात मोठी जबाबदारी देण्यात येईल असे संकेत दिले होते. पुढील महिनाभरात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वॉररूमच्या संयोजक पदी अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा महाराष्ट्रचा वॉररुम सक्षम बनवण्यासाठी त्यांचे पूर्णवेळ योगदान आहेच. त्याचबरोबरीने आज नरिमन पॉईंट मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अविनाश पराडकर यांची प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या पदावर सिंधुदुर्गच्या सुपुत्राला स्थान मिळाल्याबद्दल जिल्हा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चैतन्य आल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स