ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे 'लोक गौरव' पुरस्काराने सन्मानित ; भक्ती, सेवा व सहकारी वृत्तीच्या जीवनाचा गौरव.

अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे 'लोक गौरव' पुरस्काराने सन्मानित ; भक्ती, सेवा व सहकारी वृत्तीच्या जीवनाचा गौरव.

प्रकाशन: 02 Feb 2023 02:54 PM
वाचन संख्या 38

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरास रोज विविध स्वामी भक्त भेटी देत असतात. सर्वांना स्वामी दर्शनाचे नियोजन, भक्ती, सेवाभाव व सहकार हे सुत्र अंगिकारून येथील देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वामी सेवेकरीता भरीव योगदान देत आपले जीवन भक्ती, सेवा व सहकाराकरिता समर्पित केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्काराने महेश इंगळे याना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष निलेश अनभवणे यांनी त्यांना सन्मानित केले.

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांना यंदाच्या वर्षीचे शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार समितीचे अध्यक्ष निलेश अनभवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. निलेश अनभवणे म्हणाले, येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने अलीकडील काळात धार्मिक, आध्यात्मिक, व भाविकांना स्वामी दर्शन सेवाकार्यात भरीव योगदान देत स्वामी सेवेचे व्रत जोपासले आहे. या कार्यास मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचे भरीव योगदान लाभले असल्याने हे सर्व शक्य होत आहे. महेश इंगळेंचे जीवन भक्ती, सेवा व सहकाराने परिपूर्ण असल्याने जानेवारी २०२० साली बिहार येथील विक्रमशीला हिंदी विद्यापीठच्या वतीने सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन प्रथम कुलगुरू डॉ.इरेश स्वामी, व विक्रमशीला विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरु डॉ. संभाजी बावीस्कर यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्य स्तरीय नवरत्न पुरस्कार, महाराष्ट्र सर फौंडेशनच्या वतीने ऑक्टोबर २०१८ रोजी सर पुरस्कार आदी पुरस्कारांसह त्यांचे आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या पुरस्काराने सन्मान झालेले आहेत.

यावेळी पुरस्कार समितीचे प्रथम अनभवणे, रामनाथ कोळी, अमर कोळी, राहूल तेंडूलकर आदींसह अरुण विभुते काका सुतार, मंदिर समितीचे आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, जमगे व स्वामी भक्त उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 19
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स