ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आंगणेवाडी सजू लागली ; हंगामी दुकानदारांची लगबग वेगाने सुरु.

आंगणेवाडी सजू लागली ; हंगामी दुकानदारांची लगबग वेगाने सुरु.

प्रकाशन: 02 Feb 2023 01:55 PM
वाचन संख्या 181

लाखो भाविकांना केंद्रबिंदू ठेवून नियोजन ; यजमान देवस्थान समिती व प्रशासन सज्ज.

मसुरे | प्रतिनिधी : आतापासून अवघ्या दिड दिवसांतच म्हणजेच ४ फेब्रुवारी २०२३ ला सुरु होणाऱ्या यंदाच्या मसुरे गांवच्या आंगणेवाडीच्या देवी भराडी मातेच्या जत्रोत्सवा साठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ अहोरात्र मेहनत घेत आहे.

नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या भराडी देवीचा वार्षिकोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यात्रे पूर्वीच आंगणेवाडीत व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे. हॉटेल व्यावसाईक, मिठाई व्यापारी आंगणेवाडीत दाखल झाल्याने परिसरात मालवणी खाजाचा घमघमाट पसरला आहे. मागील तीन वर्षे कोरोना साथी मध्ये मर्यादित स्वरूपात झालेल्या जत्रोत्सव नंतर या वर्षी शनिवार सोबतच रविवार सुट्टी  असल्याने भाविकांची,चाकरमान्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारानी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकाना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकाना केंद्र बिंदु मानुन त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकाना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यानी दिली आहे.
त्याच प्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी सुद्धा भाविकांना देवीची ओटी भरणे व दर्शन घेता येणार आहे. 

आंगणेवाडीत किराणा व्यावसाईक, स्वीट मार्ट, मनोरंजन खेळणी, आकाश पाळणे आदि व्यापाऱ्यानी आपली दुकाने थाटण्यास सुरवात केली आहे. भाविकांच्या दर्शन रांगा, लाकडी उड्डाण पुल, विद्युत रोषणाई, मुख्य सभामंडप आदि ठिकाणचे काम अखेरच्या टप्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने यात्रेतील तात्पुरत्या व्यावसाईकाना वीज कनेक्शन देणे, ओहर हेड वायर अंडर ग्राउंड करणे,  ट्रान्सफॉर्मर एकत्र करणे आदि कामे जोरदार चालू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्व रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता व पाणीशुध्दीकरण कामासाठी कार्यरत आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा बंदोबस्त कामात दक्ष झालेली दिसून येत आहे.ग्रामस्थ मंडळा बरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणे कडून यात्रेकरुंच्या सोई साठी पुरेपुर व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर्शन रांगांच्या मार्गात भाविकांसाठी पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.



कोकण रेल्वे कडुन मुंबई वरुन येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा  फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री सदर रेल्वे मुंबई येथून सुटणार आहे. या जादा गाडीला सिंधुदुर्गातील सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.  रेल्वेच्या वेळापत्रका नुसार कणकवली व ओरोस  स्टेशन वरुन आंगणेवाडीसाठी जादा एसटीच्या फेऱ्याचे नियोजन एसटी कडुन करण्यात आले आहे. 
एकुणच ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच  विविध राजकिय पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या स्वागत कमानीनी आंगणेवाडी सजु लागली असून केवळ दोनच दिवसानी लाखो भाविकांचे स्वागत करण्याचे भाग्य समस्त आंगणे कुटुंबियाना श्री देवी भराडी मातेच्या जत्रेच्या निमित्ताने मिळणार आहे. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स