अशक्य ते शक्य करतील स्वामी ; श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट कडून ४ व ५ फेब्रुवारीला यात्रेकरूंसाठी सेवा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडीतील श्री भराडी देवी जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ‘श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास’ (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट, मालवण या संस्थेच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ’ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ४ व ५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत नाष्टा, दुपारी १२:३० ते ३ वा.पर्यंत जेवण,सांयकाळी ४ वा. अल्पोपहार देण्यात येणार आहे.
अधिक माहिती साठी संपर्क (९४२३५३८४१८), ९४२०७३८४१८ ९८२१७१९१११ येथे संपर्क साधावा असे मठा तर्फे सांगण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)