ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे ५ वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे जिल्हास्तरीय आयोजन.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे ५ वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे जिल्हास्तरीय आयोजन.

प्रकाशन: 31 Jan 2023 09:30 PM
वाचन संख्या 87

विवेक परब | ब्यूरो चीफ़ : प्राथमिक शिक्षक समिती नेहमीच विविध शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या जिल्हा परिषद शाळेतील पाचवीच्या मुलांसाठी सराव परीक्षेचे आयोजन जिल्हाभर करण्यात आले होते. सर्व केंद्रांवर अतिशय नियोजनबद्ध परीक्षा घेण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने राबवलेला शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम स्तुत्य असून समितीचे शिलेदार संघटनेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. मुलांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्पर्धा करताना संघर्ष करावा लागतो. अशा वेळी तुम्ही गुणवत्तेशी स्पर्धा करा. स्वतःशी स्पर्धा करा आणि यश संपादन करा असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.

उद्घाटन समारंभाला राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, शिंपी गुरुजी, सयाजी पाटील, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे, कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर, तालुका सरचिटणीस महेंद्र पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा नेहा मोरे, तालुका प्रवक्ते विनायक जाधव, प्रशांत दळवी, दिनेश सुद्रीक, कल्पना मलये, लक्ष्मण पावसकर, प्रवीण कुबल, परीक्षार्थी विद्यार्थी आणि समितीचे शिलेदार उपस्थित होते.
         
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी केले. त्यात त्यांनी समितीच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कणकवली, जानवली, पियाळी, साळीस्ते, कासार्डे, खारेपाटण आणि फोंडा इत्यादी परीक्षा केंद्रांना पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. कणकवली तालुक्यातील केंद्रांवर सर्व परिक्षार्थींच्या भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स