शाळांमधून नोकर वर्ग नको तर मालक वर्ग तयार होऊ द्या ; श्री. अतुल पईकाणे यांचे नाबर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात मार्गदर्शन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील ‘श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल’ या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पईकाणे ग्रुपचे संचालक तथा अध्यक्ष श्री. अतुल पईकाणे तसेच प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. जगदीश पाटील, सन्माननीय अतिथी डॉ. हेमंत पेडणेकर ,उद्योजक भाऊ वळंजू,शशी पित्रे, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मंगेश कामत , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वर्षभरात प्रशालेत घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांची बक्षीसे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
‘विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश हे कौतुकास्पद आहे .या यशात प्रशालेचे शिक्षक पालक व विद्यार्थी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाने स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे ,तरच उत्तरोत्तर यशाची शिखरे गाठता येतील, असे विचार डॉक्टर जगदीश पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ मनाली देसाई ,सूत्रसंचालन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगांवकर ,रिना मोरजकर यांनी केले .अहवाल वाचन श्रीमती रसिका वाटवे यांनी केले .पाहुण्यांचा परिचय सौ. दीक्षा नाईक यांनी तर आभार प्रदर्शन हेलन रोड्रिक्स यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्पर्धा प्रमुख प्रशालेच्या सौ स्नेहा नाईक मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)