मसुरेत माजी विद्यार्थ्यांकडून आर.पी. बागवे हायस्कूलच्या १९९२-९३ च्या १२ वी इलेक्ट्रॉनीक्स व इलेक्ट्रीकल्सच्या बॅचतर्फे शाळेला साऊंड सिस्टिम भेट.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातली सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था असलेल्या मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि तांत्रिक विद्यालयाला १९९२-९३ च्या बारावीच्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल बॅच कडून सुमारे दहा हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टम भेट देण्यात आली. या बॅचचे विध्यार्थी व मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिकसचे मालक हेमचंद्र ऊर्फ भाई कोयंडे यांनी सदर साउंड व्यवस्था सुपूर्द केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सरोज परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, विठ्ठल लाकम, मुख्याध्यापक किशोर चव्हाण, सुनील बांदेकर, एन. एस. जाधव, भरत ठाकूर, रमेश पाताडे, शशांक पिंगुळकर, श्री घाटे, समीर नाईक आदी शिक्षक, पालक , विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या मदती बद्दल महेश बागवे यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)