ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रतन वालावलकर माध्यमिक तंत्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाले स्नेहसंमेलन.

रतन वालावलकर माध्यमिक तंत्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाले स्नेहसंमेलन.

प्रकाशन: 25 Jan 2023 12:35 PM
वाचन संख्या 467

संतोष साळसकर | सहसंपादक : मुंबईतील खार (पश्चिम) येथील रतन वालावलकर माध्यमिक तंत्रशाळेच्या १९८८ च्या दहावीच्या अ, ब आणि क तुकड्यांच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल ३५ वर्षांनंतर नुकतेच एकत्र आले .

या वेळी विद्यार्थी वर्गाने शिक्षकांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रतन वालावलकर माध्यमिक तंत्रशाळेतील १० वीत शिकणारे विद्यार्थी तब्बल ३५ वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षकांच्या उपस्थितीत पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी शाळा-कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या हृदय सोहळ्यास पांडे, कैसरे, पोतदार, जोशी या शिक्षिकांसह पटेल, उथळे, चौगुले, जागडे, राजपूत, जोशी, कुलकर्णी,
गरुड, मराठे, जगताप, तोडणकर व पांचाळ हे शिक्षक आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी प्रार्थना, नृत्य, भजन, फिल्मी गाणी, छोट्या नाटिका, मूकनाट्य, कविता वाचन आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन अजय सावंत, कांबळी, रफिक कोंडकर, संतोष जाधव, शेट्ये, कुंदन करगुटकर,
यशवंत पटार, योगेश मेहेर, सुषमा वाघचौडे, स्मिता म्हात्रे व लाड आदींनी केले होते. मेहेंदळे सर, संतोष साळसकर, वाघचौरे, यशवंत पटार, डेकोरेटर हरी काका, मंदिराचे विश्वस्त, साऊंड व आरव्हीटी ग्रुप मित्र परिवार यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 304

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स