ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कलमठ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राजू राठोड मित्र मंडळाच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट स्व. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

कलमठ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राजू राठोड मित्र मंडळाच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट स्व. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

प्रकाशन: 25 Jan 2023 10:54 AM
वाचन संख्या 35

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलमठ व राजू राठोड मित्रमंडळाच्या वतीने २३ जानेवारीला हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलमठ विभाग व राजू राठोड मित्र मंडळ तर्फे शिवसेना नेते सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कलमठ येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत जयंती साजरी केली.

यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, नीलम पालव, ग्रा. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, युवा सेना समन्वय राजू राठोड, ॲड. हर्षद गावडे, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, माजी उपसरपंच वैदेही गुडेकर, आनंद कदम, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, चेतन पाटील, आशिष कांबळे, सचिन पवार, राजेश मोरे, संदीप पवार, विनोद राठोड, रतन खांडेकर, निलेश पवार, निनाद नाडकर्णी, संजय खांडेकर, अक्षय शिर्के, राजू कोरगांवकर, अब्दुल खान, रोहित जाधव, प्रणय शिर्के, संदीप पवार, गणेश घंटे, गणेश पवार, जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स