आज मालवणात साहित्यिक वैशाली पंडित यांचे 'मराठी भाषा विषयक मार्गदर्शन' व्याख्यान ; श्री.शिवाजी वाचन मंदिर तर्फे साजरा होतोय मराठी भाषा संवर्धन पंधरावडा.
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या भरड येथील श्री.दत्त महाराज मंदिर आवारातील सुप्रसिद्ध श्री. शिवाजी वाचन मंदिर तर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरावडा’ साजरा केला जात आहे . १४ ते २८ जानेवारी पर्यंत चालणार्या या उपक्रमात आज २४ जानेवारीला मालवणच्या साहित्यिक व आपली सिंधुनगरी चॅनेलच्या उपसंपादक वैशाली श्रीनिवास पंडित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यातआले आहे.
श्री. शिवाजी वाचन मंदिरच्या नविन इमारतीत संध्याकाळी ५ वाजता हे मार्गदर्शनपर व्याख्यान होत असून या व्याख्यानाला तसेच उर्वरित सर्व दिवसांच्या उपक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. शिवाजी वाचन मंदिर तर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)