नव्याने पुनर्बांधणी झालेल्या जयभवानी चिंदर संघाची चमकदार कामगिरी ; शिरवडे येथील क्रिकेट स्पर्धेत मिळवले उपविजेतेपद.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथील नव्याने पुनर्बांधणी झालेल्या जयभवानी चिंदर संघाने आज जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांची मनं जिंकली.
शिरवडे पिंपळवाडी येथे झालेल्या भव्य खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत जयभवानी चिंदर संघाने उपविजेतेपद मिळवत क्रिकेट रसिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. खुल्या स्वरुपात खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण २४ संघाचा सहभाग होता. अंतिम सामन्यात कणकवली संघाकडून जय भवानी संघ पराभूत झाला तरिही जय भवानी संघाच्या नवोदीत झुंजार खेळाडुंच्या चमकदार कामगिरीची मैदानावर उपस्थित क्रिकेट रसिकांकडून प्रशंसा झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)