ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या 'तारांकीत प्रश्नामुळे' जिल्ह्यासाठी डिझेल परतावा मंजूर : मालवणचे ट्राॅलर व्यावसायिक तपस्वी मयेकर.

आमदार वैभव नाईक यांच्या 'तारांकीत प्रश्नामुळे' जिल्ह्यासाठी डिझेल परतावा मंजूर : मालवणचे ट्राॅलर व्यावसायिक तपस्वी मयेकर.

प्रकाशन: 20 Jan 2023 09:36 AM
वाचन संख्या 270

तपस्वी मयेकर यांनी सर्व ट्राॅलर मच्छिमार व व्यावसायिकांतर्फे मानले मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणातले ट्राॅलर मालक तपस्वी मयेकर यांनी डिझेल परताव्याबाबत आमदार वैभव नाईक व मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

कोरोना काळ व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे हतबल झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना डिझेल परताव्यामुळे आता थोडा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा मंजूर व्हावा यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात डिझेल परतावा संदर्भात ‘तारांकित प्रश्न’ उपस्थित केला होता. या वेळी सन्माननीय मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना लवकरच मच्छिमारांना जास्तीत जास्त परतावा देण्यात येत असे असे अश्वासीत केले होते आणि त्या प्रमाणे सिंधुदुर्ग जिह्यासाठी सुमारे ६ कोटी रपयांचा डिझेल परतावा रक्कम अदा करण्यात आली.

यासाठी सर्व मच्छिमार व ट्राॅलर मालक यांच्यातर्फे आपण आमदार वैभव नाईक व मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही विशेष आभार मानत असल्याचे प्रतिपादन तपस्वी मयेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स