ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची निवड.

प्रकाशन: 17 Jan 2023 05:48 PM
वाचन संख्या 96

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मालवण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात संघटना वाढीबाबत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील सर्वच अल्पसंख्याक बांधवांना एकत्रित करुन लवकरच कार्यकारिणी बनवणार असल्याचे श्री. ताजर यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आनंद परुळेकर, पल्लवी तारी- खानोलकर, मेघश्याम लुडबे, महेंद्र मांजरेकर, देवानंद लुडबे, जेम्स फर्नाडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, पराग माणगावकर, योगेश्वर कुर्ले, महिला तालुकाध्यक्षा ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, शोभना चिंदरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स