ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा पोलीस अधिक्षक अग्रवाल यांना नाभिक व्यावसायिकांनी दिले निवेदन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा पोलीस अधिक्षक अग्रवाल यांना नाभिक व्यावसायिकांनी दिले निवेदन...!

प्रकाशन: 16 Jan 2023 07:40 PM
वाचन संख्या 61

विवेक परब | ब्यूरो चीफ : हल्ली ऑनलाईन व्यवहार ही काळाची गरज बनली आहे. असे असले तरी अनोळखी व्यक्तींच्या फोनला बळी पडून बँक खाते खाली करण्याचेही प्रकार घडत आहेत. सध्या नाभिक व्यावसायिकही यांत भरडले जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
कणकवली, कुडाळ या शहरांमध्ये नाभिक व्यावसायिकांना फ्रॉड कॉल करुन त्यांना फसवण्यासाठी फोन येत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे कार्यकर्ते रुपेश पिंगुळकर यांनाही या घटनेला तोंड द्यावे लागले आहे. या घटनेची दखल घेत सिंधुदुर्ग नाभिक संघटनेने तातडीची ऑनलाईन सभा घेऊन सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्याचे ठरविले. सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेत निवेदन देऊन आपल्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी लेखी पत्र दिले आहे.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, जिल्हा नेते जगदिश चव्हाण, रुपेश पिंगुळकर, माजी कुडाळ तालुकाध्यक्ष नितेश पिंगुळकर, कणकवली नाभिक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ चव्हाण, संपर्क प्रमुख निलेश चव्हाण, संजय कुबल, रोशन चव्हाण, मनोज चव्हाण, प्रकाश लाड आदी नाभिक व्यावसायिक प्रामुख्याने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स