स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात भूगोल दिवस झाला साजरा .
मालवण | प्रतिनिधी : १४ जानेवारी हा भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस साजरा करताना तज्ञांचे भौगोलीक दृष्टीकोन व अभ्यास यांची विद्यार्थी वर्गाला ओळख करुन दिली जाते व संवादही साधला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेत भूगोल विभागाच्या वतीने भूगोल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्यासह प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी रवींद्र गावडे यांनी डॉ. एस, ए. ठाकूर व इतर प्राध्यापकांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. एस. ए. ठाकूर यांनी भूगोल दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा आपण फक्त ऐतिहासिक आहे असे समजतो परंतु तो उभारण्यासाठी महाराजांचा भौगोलीक दृष्टीकोन देखील तो उभारण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे असे स्पष्ट केले .
यावेळी बी. एच. चौगुले, डॉ. उज्वला सामंत, के. के. राबते, हंबीरराव चौगले, बर्वे मॅडम, एम. आर. खोत यांनी आपले विचार मांडून भूगोल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भूगोल दिनानिमित्त भित्तीपत्रकांचे प्रदर्शन व प्रतिकृती यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार यादव याने केले तर आभार ए. व्ही. जाधव यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)