ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडेत गोंधळ उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न.

बांदिवडेत गोंधळ उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न.

प्रकाशन: 15 Jan 2023 07:17 AM
वाचन संख्या 186

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील श्री पावणाई भगवती मंदिर येथे  दुसरा वार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात शुक्रवारी संपन्न झाला. “उदे गं अंबे उदे” च्या जयघोषात व भक्तीपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

सकाळी देवीची विधीवत पुजा झाल्या नंतर सुवर्णलंकार व भरजरी वस्त्रांनी देवीला सजविण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माहेरवाशीणीनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. रांगेतुन सर्वाना दर्शन मिळावे यासाठी वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या.

रात्री दिवटी पुजन व  मांड भरल्या नंतर गोधळ कार्यक्रम झाला. दिवटीस भक्तिने तेल अर्पण करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसाद सर्वाना देण्यात आला. रात्री उशिरा वाढलेल्या थंडीची तमा न बाळगता हजारो भविकांची गर्दी झाली होती. उत्सवा निमित्त देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळुन गेला होता. मुंबई येथील शाम डेकोरेटर्सचे शाम परब यानी सर्व विद्युत रोषणाई केली होती. बांदिवडे पंचक्रोशीसह विविध ठिकाणाहुन आलेल्या देवीच्या भक्तानी, मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमान्यानी उपस्थिती दर्शविली. 

गोंधळ कार्यक्रमास प्रारंभ झाल्या नंतर रात्री नेत्रदिपक फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. देवालय परिसरात हंगामी स्वरुपाची हॉटेल, मिठाई दुकाने, बचत गटांचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने उभारण्यात आली होती. खेळणी खरेदी करण्यासाठी लहान मुलानी गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. देवस्थान मानकरी व ग्रामस्थ, माहेर वाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उत्सव यशस्विते बद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स