ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आजगावात 'गोगटे गुरुजी प्रतिष्ठान' ची स्थापना
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आजगावात 'गोगटे गुरुजी प्रतिष्ठान' ची स्थापना

प्रकाशन: 09 Jan 2023 10:50 PM
वाचन संख्या 23

विवेक परब/ ब्यूरो चिफ: आजगाव-धाकोरे येथील पूज्य ग.के. गोगटे गुरुजी यांनी आजगाव मराठी शाळेत १९६५ साली शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षेचे बीज रोवले आणि शाळेतून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू लागले. त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ज्ञानदानाचा यज्ञ अनेक वर्ष चालविला. त्यांच्या पवित्र स्मृती चिरंतन रहाव्या म्हणून गुरुजींचे विद्यार्थी व त्यांना मानणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन त्यानी ‘पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान ‘ ची स्थापना केली आहे. विनामूल्य शैक्षणिक कार्य करू इच्छिणाऱ्या या संस्थेने दि.२१ नोव्हेंबर २०२२ पासून शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग आजगाव मराठी शाळेत सुरू केले आहेत. आजगाव परिसरात मिडलस्कूल स्कॉलरशिपचे रोज तीन तास मार्गदर्शन वर्ग सुरू आहेतच, त्याशिवाय हायस्कूल स्कॉलरशिपचे वर्ग व सराव परीक्षाही सुरू करण्यात आल्या आहेत. कुणाकडूनही पैसे न गोळा करता वा फी न आकारता ‘ज्ञानदान यज्ञ’ चालविण्यासाठी विनय सौदागर, माधुरी काकतकर, उदय नातू, प्रमोद नाईक, वंदना साळगावकर, दीपक प्रभू, हेमंत प्रभू, महेंद्र प्रभू,संजय पंडीत, शाम धाकोरकर, अविनाश जोशी, गिरीश बेहेरे, शाम बेहेरे, क्षमा पुराणिक, विजया आजगावकर , मंदाकिनी नाईक व श्यामप्रसाद तेंडुलकर हे विद्यार्थी एकत्र आले आहेत. गुरुजींचे चिरंजीव संतोष गोगटे आणि नातू गणेशप्रसाद गोगटे हेही सोबत आहेत. हे कार्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी वा यात सहभागी होऊ इच्छित असलेल्यांनी विनय सौदागर (मो. ९४०३०८८८०२) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स