ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बी.एस.एन.एल चा कास येथील टॉवर दुरस्ती करुन ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासंदर्भात निवेदन
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बी.एस.एन.एल चा कास येथील टॉवर दुरस्ती करुन ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासंदर्भात निवेदन

प्रकाशन: 09 Jan 2023 06:50 PM
वाचन संख्या 28

बांदा /राकेश परब: भारत संचार निगम लिमिटेडच्या कास येथील टॉवर परिसरात वारंवार नेटवर्कच्या समस्येमुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कास गावासह परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवा मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी बीएसएनएलच्या अभियंत्यांकडे केली आहे. यावेळी विठ्ठल पंडित, समीर किनळेकर उपस्थित होते.सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या बीएसएनएलच्या कास येथील टॉवरची कार्यक्षमता वाढविणे नितांत गरजेचे आहे. सातोसे, सातार्डा, मडुरा, पाडलोस, रोणापाल, शेर्ले परिसरात बीएसएनएल ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नेटवर्कची समस्या दूर करणे महत्त्वाचे आहे. एखाद्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास नेटवर्क समस्या उद्भवते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसतो. या सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार करून बीएसएनएलने सदर समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी भारत संचार निगम लिमिटेड सावंतवाडी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स