ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तेरेखोल नदीतील रेती उपसामुळे सातोसे व कास गावातील ग्रामस्थांची जमिनीसह शेती-बागायती पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे रेती उपसा कायमचा बंद करावा अन्यत उपोषणाचा इशारा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तेरेखोल नदीतील रेती उपसामुळे सातोसे व कास गावातील ग्रामस्थांची जमिनीसह शेती-बागायती पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे रेती उपसा कायमचा बंद करावा अन्यत उपोषणाचा इशारा

प्रकाशन: 09 Jan 2023 06:35 PM
वाचन संख्या 19

बांदा :राकेश परब तेरेखोल नदीतील रेती उपसामुळे सातोसे व कास गावातील ग्रामस्थांची जमिनीसह शेती-बागायती पाण्यात वाहून गेली आहे. सदर जमिनीचा सर्वे करून झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी व रेती उपसा कायमचा बंद करावा, अन्यथा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे उपोषणास बसणार असल्याचा असल्याचा इशारा जगन्नाथ पांडुरंग पंडित व कास सरपंच प्रविण पंडित यांनी प्रशासनास दिला आहे. सातोसे व कास गावाजवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असते. यावर आळा घालण्याची वारंवार मागणी करूही याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या स्वरूपात याचा मोठा फटका बसला. नारळाच्या झाडांसह शेती बागायतदार यांची जमीन पाण्यात वाहून गेल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न श्री.पंडित यांनी प्रशासनास विचारला. जमिन व शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी तसेच रेती उपसा कायमचा बंद करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही २४ जानेवारीपर्यंत न केल्यास सातोसे व कास गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा जगन्नाथ पंडित यांनी दिला आहे.दरम्यान, बांदा महसूल मंडळ अधिकारी आर.वाय. राणे यांनी कास येथे काल रेती उपसा संदर्भात पाहणी केली असता काही आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कास सरपंच प्रविण पंडित, उपसरपंच गजानन पंडित, ग्रा. पं. सदस्य रुक्मिणी पंडित, नीरज पंडित, तलाठी श्रीमती भिंगारे, कोतवाल विनोद धुरी, मडुरा कोतवाल विष्णु वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स