राजा शिवाजी विद्यालय, विलवडे शाळेचे ९ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण
बांदा /राकेश परब: ग्रामोन्नती मंडळ,मुंबई संचलित राजा शिवाजी विद्यालय, विलवडे येथे सोमवार दिनांक ९ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण,विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे.
सायकांळी ८ वाजता समारंभ अध्यक्ष माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोदभाई कामत व उद्घाटक राष्ट्रवादी क्राँग्रेस पार्टी कोकण विभाग महिला अध्यक्ष मा.साै.अर्चना घारे परब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे माजी उपसभापती मा. श्री. विनायकभाई दळवी, श्री कृष्णा सावंत, माजी पंचायत समिती श्री सदस्य संदीप गावडे,विलवडे सरपंच श्री प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष संभाजी दळवी मुख्याध्यापक बुध्दभूषण हेवाळकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)