ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोणापाल माऊली मंदिरात दशावतार नाट्यमहोत्सव संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोणापाल माऊली मंदिरात दशावतार नाट्यमहोत्सव संपन्न

प्रकाशन: 09 Jan 2023 06:24 PM
वाचन संख्या 57

बांदा : राकेश परब:  रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ व श्री देवी माऊली देवस्थान समिती आयोजित मंदिरात ४ ते ८ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय दशावतारी नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने मंदिरात आयोजित लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम सोहळ्याला पंचक्रोशीसह चाकरमानीही मोठ्या संख्यने उपस्थित होते.      

  नाट्यमहोत्सवात जय हनुमान दशावतार मंडळ, आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ व मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाट्यप्रयोग झाले. रविवारी लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम व शुध्दीकरण कार्यक्रम, महाआरती, महाप्रसाद, संचारित देवतांचा आशिर्वाद व सवाद्य देवता भ्रमण हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्री देवी माऊली उत्सव मंडळातर्फे सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स