ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विनया सातार्डेकर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विनया सातार्डेकर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

प्रकाशन: 08 Jan 2023 06:46 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्रतिनिधी मुंबई पारस काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि.). सानपाडा, नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १या प्रशालेच्या विनया सातार्डेकर यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वातावरण निर्माण केले. स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय उपक्रम सुरू करून राबविले. ५ वी स्कॉलरशिप नियोजन केल्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. शाळेची पटसंख्या वाढ करण्यात मोठा वाटा आहे. शालेय तसेच सामाजिक उपक्रमात कृतीशील सहभाग. भविष्यात जामसंडे नं. १ ही शाळा आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. विद्यार्थ्यांसाठी पालक, समाजाच्या सहकार्यामुळे भौतिक सुविधा उपलब्ध करून आले आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या स्पर्धा परीक्षेमधून या प्रशालेतील २ मुलींची इस्त्रोसाठी निवड झाली. दानशूर दात्यांनी शाळेसाठी भरीत मदत दिलेली आहे. दिक्षिता दिलीप पालव या गरजू मुलीचे पालकत्व स्वीकारलेले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सातार्डेकर म्हणाल्या. शाळा व्य. समिती, पालक शिक्षक संघ, माता-पालक संघ, सर्व पदाधिकारी, सर्व पालक वर्ग, सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे मी विविध उपक्रम राबवू शकले. माझे पती, मुलगा, माझे कुटुंब यांचा या पुरस्कारात मोठा वाटा असल्याचे त्या म्हणाल्या. या पुरस्कारामुळे समाजाच्या सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स