ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वायंगणी हायस्कुलचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान-सरपंच रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वायंगणी हायस्कुलचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान-सरपंच रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन..!

प्रकाशन: 08 Jan 2023 02:36 PM
वाचन संख्या 206

विद्यार्थ्यांच्या विविध गुण दर्शन कार्यक्रमाने स्नेहसंमेलन उत्साहात

विवेक परब/ ब्यूरो चिफ: मालवण तालुक्यातील, ज्ञानदीप संस्था वायंगणी, संचलित ज्ञानदिप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचे स्नेहसंमेलन दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा गौरव प्रशालेच्या वतीने करण्यात आला. प्रशालेतर्फे आंतर शालेय खेळवण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धांत विद्यार्थ्यांमधून कु. विपुल रामदास सावंत हा अधिक बक्षिसे पटकवून अव्वल ठरला तर विद्यार्थिनींमध्ये कु. कनिष्का संतोष सावंत हिने सर्वाधिक अधिक बक्षिसे पटकवली. कु. रिया अशोक तारी हि प्रशालेची आदर्श विद्यार्थीनी ठरली तर कु. सुमीत रामदास सावंत हा आदर्श विद्यार्थी ठरला. कु. मृणाली संतोष गोसावी हिला अष्टपैलु विद्यार्थीनी म्हणून गैरविण्यात आले.
वायंगणी गावचे नुतन सरपंच रूपेश पाटकर हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. वायंगणी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी पाटकर यांनी केले. व्यासपिठावर ज्ञानदीप संस्था वायंगणीचे संस्थाध्यक्ष सदानंद राणे, सचिव वैभव जोशी, खजिनदार वायंगणी उपसरपंच समृद्धी आसोलकर, गटविकास अधिकारी माने, कें, प्रमुख गुरव,सौ. संजना रेडकर, मुख्याध्यापक टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलला. प्रशालेची माजी विद्यार्थीनी अँड. समृद्धी अजितकुमार आसोलकर (ज्ञानदिप संस्था वायंगणीची पदसिद्ध खजिनदार तथा वायंगणी गावची विद्यमान उपसरपंच) त्याप्रमाणे माजी विद्यार्थी योगेश साळकर, सुशांत आसोलकर, कमलेश माळकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी बक्षिसांचे चषक पुरस्कृत केले.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणदर्शनाच्या कार्यक्रमात ‘व्यसनासुराचा वध’ हा दशावतारी नाटयप्रयोग कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला.
यावेळी उदय दुखंडे, मनोहर वायंगणकर, दिपक सावंत, रसिका सावंत, अर्चना सावंत, शाम सावंत, शिक्षक वर्ग, बहुसंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्तविक टकले सर यांनी, सुत्रसंचालन पाटकर मँडम यांनी तर आभार बांवकर मँडम यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स