समिर चांदरकर यांना "श्रीरंग कलागौरव" पुरस्कार जाहीर....!
२६ जानेवारीला पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
विवेक परब/ ब्यूरो चिफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वराडकर हायस्कूल मालवण कट्टाचे कला शिक्षक ‘समिर अशोक चांदरकर’ यांना कला दर्पण कला प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा रांगोळी कला क्षेत्रातील मानाचा “श्रीरंग कलागौरव” पुरस्कार जाहीर झाला आहे. रांगोळी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असलेल्या व्यक्तीमत्वास हा पुरस्कार दिला जातो. बालगंधर्व कला दालन पुणे येथे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते श्री तिरुपती बालाजी चरित्र रंगावली प्रदर्शनात २६ जानेवारीला समिर चांदरकर यांना या पुरस्काराचे वितरण होणार आहे. श्रीरंग कला गौरव सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानवस्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)