सावित्रीबाईंमुळे स्त्री शक्ती...!
मसुरे | प्रतिनिधी: दर्पण प्रबोधनी सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिन कलमठ बौद्धवाडी समाज मंदिर येथे साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले या स्त्रियांना मोठं वरदान ठरल्या आणि म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आजची स्त्री आपल्याला पुढे जाताना दिसत आहे.
नारी शक्ती ही केवळ सवित्रीबाई फुलें मुळेच तयार झाली असे प्रतिपादन दर्पण महिला फ्रंट अध्यक्ष स्नेहल तांबे यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे, उपाध्यक्ष प्रज्ञा कदम, नरेंद्र तांबे, संदेश कदम, संजना तांबे , किशोर कदम,महेंद्र कदम,राजा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या देशांमध्ये स्त्री क्रांती जर कोणी केली असेल तर ती एकमेव स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले.सामाजिक चळवळीमध्ये स्त्रियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ग्रामीण भागातील स्त्रियांचे स्थान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन अध्यक्ष आनंद तांबे यांनी केले. संस्थेचे सल्लागार श्रीधर तांबे म्हणाले, जिल्हा बँकेकडून बचत गटांसाठी लघुउद्योग सुरू करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करेन.
सामाजिक चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ने करावे असे विचार माजी अध्यक्ष किशोर कदम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवडाव बौद्ध विकास संघाच्या बालचमुने क्रांतिकारी गीताने केली. यावेळी शिवडाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीते सादर केली संगीत संयोजक संदेश तांबे,तबला सुधीर तांबे,ढोलकी वैभव तांबे यांनी संगीत साथ देऊन कार्यक्रमाची उंची वाढवली. प्रास्ताविक उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, निवेदन संदेश तांबे यांनी केले तर आभार अनुष्का तांबे यांनी मांनले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी सचिव संतोष तांबे, सहसचिव विशाल हडकर, डॉक्टर व्ही.जी. कदम, प्रकाश कदम, डॉ. सिद्धार्थ तांबे प्रशिक अध्यक्ष नंदकुमार कासले,सुनील तांबे, तसेच बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होते.
सार्था किशोर कदम हिने मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची वावहा मिळवली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)