दिल्लीला जाणाऱ्या आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षक समिती कडून सत्कार!
विवेक परब/ ब्यूरो चिफ: 26 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2023 रोजी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे संचलन करण्यासाठी आचरा येथील काॕलेजच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निश्चितच ही बाब सिंधुदुर्गवासियांसाठी भूषणावह आहे. मुंबई येथे पार पडलेल्या आॕडिशनमध्ये सदर विद्यार्थ्यांची निवड झाली. ग्रामिण भागातील मुलेसुद्धा कलागुणसंपन्न असतात हे यातून सिद्ध झाले.
त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवण तर्फे पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षक समिती शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमी लढतच असते त्याचबरोबर समाजातील गरजूंना मदत करणे, रक्तदान शिबीरे, अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य आदि उपक्रम राबवत आहे. निश्चितच आपल्या यशाचा अभिमान आम्हां शिक्षकांना आहे असे यावेळी संचालक राजेंद्रप्रसाद गाड म्हणाले.
यावेळी पतपेढी संचालक राजेंद्रप्रसाद गाड, विभागीय संघटक राजन जोशी, विनोद कदम, प्रवक्ते नवनाथ भोळे, नथू खानेकर, आरिफ कच्छी, यशवंत पाटील, रुपेश दुधे, रणजित देवकर, संघरत्न घुले, गोविंद पाटील आदि समिती कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षकांनी निवड झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)