ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
छत्रपतींचे वंशज आले पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या भेटीला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

छत्रपतींचे वंशज आले पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या भेटीला..!

प्रकाशन: 04 Jan 2023 04:29 AM
वाचन संख्या 459

छत्रपतींच्या तामिळनाडू मधील तंज़ावर राज्याचे महाराज बाबाजी राजे..

मालवण | सुयोग पंडित : पद्मश्री परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त होण्यापूर्वी व प्राप्त झाल्यानंतरही अनेक दिग्गजांनी भेट दिली आहे. पद्मश्रींच्या पिंगुळी कुडाळ येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरीलाही असंख्य मान्यवर भेट देत असतातच.
अशीच एका अतिशय अनोख्या व्यक्तिने नुकतीच कला अंगणच्या आर्ट गॅलरीला भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील तंजावर राज्याचे महाराज बाबाजी राजे यांची ती ‘मोठी भेट’ ठरली .
प्रचंड विनम्र व्यक्तिमत्व आणि आजही अत्यंत  आपल्या तंजावर मधील मराठी लोकांना एक हक्काचा आधार म्हणून महाराज बाबाजी राजे सुप्रसिद्ध आहेत.  “आम्ही घरी शुद्ध मराठी बोलतो”, असे सांगत महाराज बाबाजी राजे यांनी आपल्या तंज़ावर आणि महाराष्ट्राचा इतिहास पद्मश्रींच्या कुटुंबीयांना सांगितला असे पद्मश्री पुत्र चेतन गंगावणे यांनी सांगितले आहे.
पद्मश्री गंगावणे यांचा कामाचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
गंगावणे कुटुंबच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजी राजे यांनी तमिळनाडूमध्ये राज्यात तंज़ावर राज्याची स्थापना केली होती असाही इतिहास या दरम्यान महाराज बाबाजी राजे यांनी कथन केला.

या भेटीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील लोक कला व इतर मातिशी निगडीत कौशल्यांशी दक्षिण भारतालादेखील सहजपणे जोडले जाता यायचा एक ‘मराठी मार्ग’ खुलल्याचेही पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे पुत्र चेतन गंगावणे यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स