ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भाजपा वेंगुर्ले महिला मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन….!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा वेंगुर्ले महिला मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन….!

प्रकाशन: 03 Jan 2023 07:27 PM
वाचन संख्या 65

विवेक परब | ब्यूरो चीफ : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यार्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणार्या सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचे काम केले. ज्या काळात मुलींचे शिक्षण म्हणजे अशक्य गोष्ट होती, त्या काळात ज्योतीबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी सुरुवात केली आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली अशा प्रकारे आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर व महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर, नगरसेवीका साक्षी पेडणेकर व ईशा मोंडकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, सई चेंदवणकर, छोटू कुबल उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स