ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती नट वाचनालयात  साजरी.

डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती नट वाचनालयात साजरी.

प्रकाशन: 03 Jan 2023 03:29 AM
वाचन संख्या 86

बांदा | राकेश परब : जागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे डॉ. बी. बी. गायतोंडे हे बांद्याचे भूषण होते. येथील शैक्षणिक, आरोग्य सुविधासाठी त्यांनी दिलेले योगदान हे न विसरता येण्यासारखे आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी येथे केले.
बांदा नट वाचनालयात डॉ. गायतोंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, संचालक सुधीर साटेलकर, शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनी डॉ. गायतोंडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. आभार राकेश केसरकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स