विलवडे नं.१ जि.प.शाळा कबड्डी स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात ठरली अव्वल.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ ‘कबडी’ या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू दळवी,बांदा केंद्र प्रमुख संदिप गवस, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत, शिक्षक घाडे मँडम तसेच उपाध्यक्ष, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे क्रिडा शिक्षक मनोहर गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)