बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून व्ही.एन.नाबर स्कूल मधील एम.एस. एफ. सी. विभागाला प्रात्यक्षिक साहित्य भेट
बांदा /राकेश परब :श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही .एन .नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल बांदा शाळेच्या एम. एस. एफ. सी. विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून उपलब्ध करून बँक आँफ इंडिया च्या अधिकारी अश्विनी अशोक यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये सी कटर ,ग्राफ्टिंग कटर ,डिजिटल बीपी किट ,वॅट मीटर व्होल्ट मीटर, या प्रात्यक्षिक साहित्य खरेदीसाठी आवश्यक निधी देण्यात आला . यासाठी बँकेचे मॅनेजर श्री. अंकीत धवन यांनी सहकार्य केले. दहावी मधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक साहित्य शाळेला भेट देण्यात आले .
यावेळी मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, विभाग प्रमुख रिना मोरजकर, एम.एस. एफ. सी. विभागाचे समन्वयक श्री. राकेश परब, निदेशक श्री.भिकाजी गिरप, निदेशिका सौ.रिया देसाई, सौ. गायत्री देसाई उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)