खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डाॅ. व्ही.के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचे २९ व ३० डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन.
बांदा | राकेश परब :
दि बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डाॅ. व्ही.के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्लिश मिडियम स्कूल,बांदा प्रशालेत गुरुवार दिनांक २९ व शु्क्रवार ३० डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन ‘रंगशिशिर सन २०२२-२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,कार्यक्रमाचे उद्घाटक संस्था सचिव कल्पना तोरसकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन सोहळा सपन्न होणार आहे.
गुरुवारी २९ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन, फॅशन परेड, अल्पोपहार सायंकाळी ६ ते रात्रौ १० विविध गुणदर्शन कार्यक्रम(इंग्लिश मिडियम व माध्यमिक विभाग), शुक्रवारी ३० रोजी सकाळी ८.३० ते १२.३० वाजता व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा ( इंग्लिश मिडीयम स्कूल,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग),सायंकाळी ६ ते रात्रौ १० वा विविध गुणदर्शन कार्यक्रम (उच्च माध्यमिक विभाग) कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्षा प्रा.सीमाताई तोरसकर व मुख्याध्यापक एम.एम. सावंत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)