भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी……!
विवेक परब | मुख्य संपादक :
भारतीय राजनीतीतील अजातशत्रू व्यक्तीमत्व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आदरांजली वाहताना एक कुशल वक्ता, विश्वविख्यात कूटनितिज्ञ , हिंदी साहित्याचे महान रचनाकार अशी त्यांची ख्याती होती.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुषमा खानोलकर, जिल्हा का.का.सदस्य वसंत ताऺडेल व बाळा सावंत,
मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, ता.सरचिटनीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवीका ईशा मोंडकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, ओंकार चव्हाण, निलेश मांजरेकर, बुथ अध्यक्ष पुंडलिक हळदणकर व रविंद्र शिरसाट व नारायण परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)